सर्वसामान्य माणूस हा शारिरीक,मानसिक किंवा बौध्दिक आजारांनी पछाडलेला दिसतो. शारिरीक आजार दूर करणे हे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य आहे. ते ज्या त्या देहाला प्रारब्धगतीप्रमाणे थोडया फार प्रमाणात भेागावेच लागतात.
मानसिक किंवा बौद्धिक आजारातून मात्र लोक सुटताना दिसत नाहीत कारण मानसिक किंवा बौध्दिक आजार (भवरोगाची बाधा) आपल्याला झाली आहे, हे मूळात सर्वसामान्य माणसाला कळत नाही. त्याचे कारण आहे अज्ञान.
१. मी कोण?
२. आलो कोठून?
३. जाणार कोठे?
४. करायचे काय?
५. करतेा काय?
या प्रश्नांची उत्तरे देणारा सदगुरु भेटत नाही म्हणून आपले सत्यस्वरुप कळत नाही. त्यामुळे निरामय अवस्था भोगता येत नाही. बऱ्याचवेळा सदगुरु या नावाखाली जगात शोधायला गेल्यास फसवणूकच जास्त वाटयाला येते.
सदगुरु आपल्याकडे आलेल्या साधकात परिपूर्ण निरामय व्यक्तीमत्व निर्माण करतात.बालवयातच असे संस्कार झाले तर पुढील पिढी सुसंस्कारित, सुदृढ, निरामय असेल.
आपला वैयक्तिक विकास पारमार्थिक अंगाने करुन देणाऱ्या अनेक संस्था आणि सदगुरु अस्तित्वात आहेत.त्यापैकीच श्री.स.स दत्तात्रय गुरुज्ञान मंदिर,गोराई हीएक संस्था!श्री. स.स माधुरीनाथांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य चालू आहे.
सद्गुरूंना शरण गेल्यावर शिष्याच्या खऱ्या पारमार्थिक अभ्यासाची सुरुवात होते. सत्य व असत्याची ओळख पटते. अभ्यासक्रमांत दिल्याप्रमाणे प्रत्येक शिष्याकडून अभ्यास करवून घेतला जातो, सखोल ज्ञान दिले जाते.