विश्वस्तसंस्थेचा दृष्टीकोन
- १. स.स. माधुरीनाथ महाराजांच्या शिकवणुकीचा विविध जाती, जमाती व धर्माच्या गरजू लोकापर्यंत प्रसार. विश्वबंधुता,
समानता, परोपकार आदी मुल्यांचा वापर करून मनुष्याची आत्मिक उन्नती साधून देणे. - २. अध्यात्मिक ज्ञानाचा खजिना साऱ्या जगापर्यंत पोहचवणे.
- ३. पूजा, ज्ञानसाधना व शिकण्यासाठी मंदिराची उभारणी करणे.
- ४. प्रत्येक गरजू व्यक्तीला सर्वांगीण उन्नतीसाठी मदत करणे
- ५. खेडयामध्ये मुलासाठी मदत केंद्र उभारणे.
- ६. पुरातन धार्मिक वा सांस्कृतिक स्थळांची पुनर्बांधणीसाठी मदत करणे
- ७. सांस्कृतिक व अध्यात्मिक जागृतीसाठी विविध उपक्रम राबवणे – वाचनालय उभारणे, विविध चर्चासत्रांचे आयोजन ई.
- ८. नैसर्गिक आपत्तीग्रस्त लोकांना आर्थिक वा ईतर मदत करणे.
- ९. समान विचारधारा असणाऱ्या इतर संस्थाबरोबर काम करणे.
- १०. वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे करणे.
संस्थेकडून मदत
१. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
२. औषधोपचाराकरिता आर्थिक मदत
३. व्यवसाय व उद्योग उभारणीकरिता आर्थिक मदत
४. परिस्थितीने गांजलेल्या गुरुभक्तांचे पुनर्वसन
५. गरजूकरिता वाचनालय